पाठ क्र.1 आपल्या संविधानाची ओळख

 प्रश्न 1)ला पुढील संकल्पना स्पष्ट करा.

1)  संविधानातील तरतुदी
उत्तर:-  देशाच्या कारभारासंबंधी च्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. या तरतुदीनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो.

2)  संविधान दिन
उत्तर:-  मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले, या दिवसालाच संविधान दिन असे म्हणतात.

 प्रश्न 2रा) चर्चा करा

1)  संविधान समितीची स्थापना केली गेली.
उत्तर:-  इसवी सन 1946 पूर्वी पर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे; तर भारतीयांनी  तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली; म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली.

2)  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.
उत्तर:-  मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले. संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला. ही सर्व कामे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हटले जाते.

3)  देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी.
उत्तर:-  देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते. म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात. 1)देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण.  2) रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन 3) शिक्षण, आरोग्यसेवा आणि दारिद्र्य निर्मूलन 4) समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपायोजना. 5) स्वच्छतेपासून संशोधना पर्यंतचे अनेक विषय.

प्रश्न 3रा) योग्य पर्याय निवडा...

1) कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही?
उत्तर:-  इंग्लंडचे

2) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर:- डॉ. राजेंद्रप्रसाद

3) पुढीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते?
उत्तर:- महात्मा गांधी

4) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 

प्रश्न 4था) तुमचे मत लिहा.

1)  शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात?
उत्तर:-  देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते. म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात. 1)देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण. 2)रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन. 3)शिक्षण, आरोग्य आणि दारिद्र्य निर्मूलन 4)समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपायोजना. 5)स्वच्छतेपासून संशोधना पर्यंतचेअनेक विषय.

2)  26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?
उत्तर:-  26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले. संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन 26 जानेवारी 1950 रोजी संविधानातील तरतुदीनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू झाले. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले;  म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.

3)  संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे.
उत्तर:-  संविधानात नमूद केलेल्या तरतुदी नुसार कोणत्याही शासनाला राज्यकारभार करावा लागतो. त्याचे पुढील फायदे होतात
 - कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या  गैरवापराला आळा बसतो. शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत. त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते. सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा राज्यकारभारात सहभाग वाढतो. त्यामुळे लोकशाही मजबूत होते. जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते. आणि नागरिकांना आपल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव होते.

Comments